Take a fresh look at your lifestyle.

महिलांसाठी सुवर्णसंधी! ‘स्मार्ट माझी आई’ प्रकल्पातंर्गत विविध प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

0

गरजु महिलांचे सक्षमीकरण व्हावे, हा उद्देश समोर ठेवत फक्त महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट माझी आई या प्रकल्पातंर्गत उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्रातर्फे एक विशेष योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत निवडक महिलांना मोबाईल/स्मार्टफोन रिपेअरिंगचा अभ्यासक्रम पुर्णपणे मोफत शिकवला जाणार असून सदर कोर्सच्या पुर्ततेनंतर समर्थपणे स्वतःचे दुकान सुरु करण्यासाठी विशेष योजनेतंर्गत सहाय्य देखील पुरविण्याचा आमचा मानस आहे. सदर योजनेचा लाभ ज्या महिलांना घ्यायचा आहे त्यांनी खालील पत्यावर संपर्क साधावा. सदर योजनेसाठी इच्छुक महिलांचे शैक्षणिक अहर्ता १२ वी पास असणे आणि वय १८ ते ३५ च्या दरम्यान असणे आवश्यक असेल. सदर कोर्सचा कालावधी ३ महिने असून रोज २ तासांचे प्रशिक्षण असेल.

 

संपर्क

उत्तर महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षण केंद्र

स्टेडिअम समोर, जळगाव.

९३७०५०७१११, ९८६०७३९१०१