Take a fresh look at your lifestyle.

Bharati Vidyapeeth Recruitment 2026: सांगलीत शिक्षकांच्या ३० रिक्त जागांसाठी थेट मुलाखत जाहीर

0

शिक्षकांच्या ३० रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा

भारती विद्यापीठ प्रशासनाने सांगली जिल्ह्यातीलग विविध महाविद्यालयांसाठी शिक्षक पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत एकूण ३० रिक्त जागांवर तात्पुरत्या स्वरूपात (Clock Hour Basis) नेमणुका केल्या जाणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवी आणि पात्र उमेदवारांना या भरतीचा लाभ घेता येणार आहे.

कोणत्या विषयांसाठी आहेत रिक्त जागा?

या भरती मोहिमेत विविध कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या विषयांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी, मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र/तर्कशास्त्र, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण, वाणिज्य, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणिशाशास्त्र, संख्याशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या प्राध्यापक/शिक्षकांची निवड केली जाणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण व वेळ

उमेदवारांची निवड कोणतीही लेखी परीक्षा न घेता थेट मुलाखतीच्या आधारे केली जाईल. मुलाखतीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे बायोडाटा (Bio-data) आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांची मूळ व छायांकित प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. मुलाखतीचे ठिकाण खालीलप्रमाणे आहे:

  • पत्ता: मातोश्री बायाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय (भारती विद्यापीठ), कडेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली.

Important Information

  • उमेदवारांनी मुलाखतीस जाताना शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.

  • ही पदे पूर्णपणे तासिका तत्त्वावर (Clock Hour Basis) भरली जात आहेत.

  • मुलाखतीच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

  • भरती संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Eligibility / Dates / Fees / Documents / Application Process

तपशील माहिती
भरती करणारी संस्था भारती विद्यापीठ, पुणे
पदाचे नाव शिक्षक (विविध विषय)
एकूण जागा ३० पदे
नोकरीचे ठिकाण सांगली
अर्ज पद्धती ऑफलाईन / थेट मुलाखत
मुलाखतीची तारीख ०१ सप्टेंबर २०२६
अर्ज शुल्क लागू नाही
अधिकृत संकेतस्थळ bvp.bharatividyapeeth.edu

 

महत्वाच्या लिंक्स:
Notification (जाहिरात PDF)   Click Here          
Official Website(अधिकृत वेबसाईट)   Click Here

भारती विद्यापीठ सांगली अंतर्गत निघालेली ही शिक्षक भरती शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इच्छुकांनी कागदपत्रांची पूर्तता करून निर्धारित वेळेत मुलाखतीस उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.