Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती २०२६: विविध पदांसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

0

पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि साथरोग नियंत्रण विभागाच्या अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मोहिमेद्वारे विविध उच्चस्तरीय व तांत्रिक पदांवर कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या केल्या जाणार असून, यासाठी राज्यभरातील पात्र उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

उपलब्ध पदे आणि तपशील

या भरती मोहिमेत वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पदांनुसार आवश्यक पात्रता आणि अनुभव वेगवेगळा आहे. मुख्य पदांमध्ये वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (०१ जागा), सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (०१ जागा), पशुवैद्यकीय अधिकारी (०१ जागा), तांत्रिक सहाय्यक (०१ जागा), कीटकशास्त्रज्ञ (०१ जागा), तांत्रिक अधिकारी – आयटी (०२ जागा) आणि डेटा विश्लेषक (०१ जागा) यांचा समावेश आहे. सर्व पदांसाठी वेगवेगळे मानधन निश्चित करण्यात आले असून, अनुभव व पात्रतेनुसार ते ३०,००० रुपयांपासून ते १,७५,००० रुपयांपर्यंत असणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे नियम

सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. अर्ज विहित नमुन्यात पूर्णपणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर वेळेत पाठवणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

Important Information

  • अर्ज केवळ ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील, त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न करू नये.

  • अर्जासोबत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे प्रमाणपत्र आणि वयाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, तिसरा मजला, मुख्य इमारत, शिवाजी नगर, पुणे.

  • मुलाखत किंवा निवड प्रक्रियेबाबतची माहिती नंतर अधिकृत संकेतस्थळावरून किंवा सूचनेद्वारे जाहीर केली जाईल.

  • उमेदवारांनी अर्जाची माहिती भरताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नये, अन्यथा अर्ज रत्त केला जाईल.

Eligibility / Dates / Fees / Documents / Application Process

तपशील माहिती
भरती करणारी संस्था पुणे महानगरपालिका (PMC)
पदांची संख्या ०८ पदे
वयोमर्यादा

खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे


राखीव प्रवर्ग: १८ ते ४३ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन (Offline)
सुरुवात तारीख २८ ऑगस्ट २०२६
अतिंम तारीख १५ सप्टेंबर २०२६
अर्ज शुल्क लागू नाही / मोफत
नोकरीचे ठिकाण पुणे

 

महत्वाच्या लिंक्स:
Notification (जाहिरात PDF)          Click Here      
Official Website(अधिकृत वेबसाईट)          Click Here      
Online Apply (ऑनलाईन अर्ज)          Click Here

पुणे महानगरपालिकेच्या या भरतीमुळे वैद्यकीय, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना महानगरपालिकेसोबत काम करण्याची उत्तम संधी मिळत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर आपले अर्ज तयार करून योग्य पत्त्यावर पाठवावेत.