Take a fresh look at your lifestyle.

MPSC गट-क भरती २०२६: ५,७०७ जागांसाठी मोठी संधी; अर्ज करण्याची मुदत वाढली!

0

राज्य शासनाच्या विविध विभागांत गट-क पदांची मेगाभरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ चे आयोजन करण्यात येत आहे. या परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेतील विविध ११ प्रकारच्या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.

भरतीमधील प्रमुख पदे आणि विभाग

या प्रक्रियेद्वारे गृह विभाग, वित्त विभाग, महसूल व वन विभाग, तसेच अन्न व नागरी पुरवठा यांसारख्या विविध विभागांमध्ये पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांनी पदांच्या स्वरूपानुसार आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज सादर करावा.

Important Information

पदनिहाय जागांचा तपशील

  • उद्योग निरीक्षक (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग): ०९ पदे

  • तांत्रिक सहाय्यक (वित्त विभाग): ०३ पदे

  • कर सहाय्यक (वित्त विभाग): २८२ पदे

  • सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (गृह विभाग): ४६१ पदे

  • लिपिक-टंकलेखक (मंत्रालयीन व विविध शासकीय कार्यालये): १,८६४ पदे

  • ग्राम महसूल अधिकारी – तलाठी (महसूल व वन विभाग): १,५३९ पदे

  • वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक: ११ पदे

  • सहाय्यक अधीक्षक: ११ पदे

  • सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक): २५४ पदे

  • लिपिक-टंकलेखक (अन्न, नागरी पुरवठा व इतर विभाग): ६५४ पदे

  • लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग): ३३९ पदे

Eligibility / Dates / Fees / Documents / Application Process

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

पद क्र. पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा (०१ ऑक्टोबर २०२६ रोजी)
उद्योग निरीक्षक इंजिनिअरिंग पदवी / टेक्नॉलॉजी डिप्लोमा / सायन्स पदवी १९ ते ३८ वर्षे
तांत्रिक सहाय्यक कोणत्याही शाखेतील पदवीधर १९ ते ३८ वर्षे
कर सहाय्यक पदवीधर + मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. १८ ते ३८ वर्षे
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक १० वी + ऑटोमोबाईल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी १९ ते ३८ वर्षे
लिपिक-टंकलेखक पदवीधर + मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि. १९ ते ३८ वर्षे
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कोणत्याही शाखेतील पदवीधर १८ ते ३८ वर्षे
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी मत्स्यविज्ञान विषयातील पदवी (B.F.Sc.)

(टीप: मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनाथ उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत सूट लागू राहील.)

महत्त्वाच्या तारखा

तपशील सुधारित तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२६
संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६

परीक्षा शुल्क

वर्ग / प्रवर्ग परीक्षा शुल्क
खुला (अराखीव) प्रवर्ग ₹३९४/-
मागासवर्गीय / EWS / अनाथ ₹२९४/-
माजी सैनिक ₹४४/-

 

महत्वाच्या लिंक्स:
शुद्धीपत्रक-1 Click Here
शुद्धीपत्रक-2 Click Here
शुद्धीपत्रक-3 Click Here
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज   Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

 

महाराष्ट्र शासकीय सेवेत गट-क संवर्गात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या पदवीधर आणि तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन विहित वेळेत आपला अर्ज ऑनलाईन सादर करावा.