भारतीय हवाई दलात ‘अग्निवीरवायु’ पदांची बंपर भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
हवाई दलात रोजगाराची सुवर्णसंधी
भारतीय हवाई दलाने देश विदेशातील सुरक्षा गरजा लक्षात घेऊन नव्या दमाच्या तरुणांची भरती सुरू केली आहे. चार वर्षांच्या निश्चित सेवाकाळासाठी राबविल्या जाणाऱ्या या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून युवकांना हवाई दलाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि कार्यपद्धतीचा भाग होण्याची संधी मिळणार आहे. या भरती प्रक्रियेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही उमेदवारांना समान संधी देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक गुण
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दोन वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत:
विज्ञान शाखेचे उमेदवार (Science Subjects)
उमेदवारांनी गणित, भौतिकशास्त्र (Physics) आणि इंग्रजी या विषयांसह बारावी (१०+२) परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच इंग्रजी विषयात वैयक्तिकरित्या किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे. किंवा उमेदवाराकडे शासनमान्य संस्थेचा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यापैकी कोणत्याही शाखेतील ३ वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा डिप्लोमा असावा.
विज्ञान व्यतिरिक्त इतर शाखा (Other Than Science Subjects)
केंद्रीय किंवा राज्य शिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या कोणत्याही शाखेतून ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण असणारे उमेदवारही यासाठी पात्र आहेत. मात्र, त्यांच्यासाठीही बारावीत इंग्रजी विषयात किमान ५०% गुण असणे बंधनकारक आहे.
संगीतकार (Musician) पदासाठी विशेष भरती
ज्या उमेदवारांना संगीताची आवड आहे आणि त्यांनी संगीताचे रीतसर शिक्षण घेतले आहे, अशांसाठी हवाई दलाने एक विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘अग्निवीरवायु इनटेक 01/2027 (म्युझिशियन)’ अंतर्गत १०वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येईल.
या पदासाठी उमेदवाराकडे उत्तम संगीत क्षमता असणे आवश्यक आहे. त्यांना गाण्याचा टेम्पो, पिच आणि अचूकता राखता आली पाहिजे. याशिवाय स्टाफ नोटेशन, टॅब्लेचर, टॉनिक सोल्फा किंवा हिंदुस्तानी/कर्नाटिक संगीतातील कोणत्याही एका पद्धतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वाद्ये ट्यून करण्याचे कौशल्य देखील उमेदवाराकडे असावे.
Important Information
- सेवा कालावधी: निवड झालेल्या उमेदवारांना ४ वर्षांसाठी अग्निवीरवायु म्हणून सेवा द्यावी लागेल.
- परीक्षा पद्धती: नियमित उमेदवारांसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, तर संगीतकार पदासाठी थेट भरती मेळावा (Recruitment Rally) आयोजित केला जाणार आहे.
- भरती मेळाव्याचे ठिकाण (संगीतकार पदासाठी):
१) २ एएससी, केअर ऑफ रेस कोर्स कॅम्प, एअर फोर्स स्टेशन, नवी दिल्ली.
२) ७ एएससी, नंबर १ कब्बन रोड, बेंगळुरू (कर्नाटक).
Eligibility / Dates / Fees / Documents / Application Process
वयोमर्यादा (Age Limit)
| पदाचे नाव | जन्मतारीख (या दरम्यान असावी) |
| अग्निवीरवायु इनटेक 02/2027 | ०१ जुलै २००५ ते ०१ जानेवारी २०१० |
| अग्निवीरवायु म्युझिशियन 01/2027 | ०१ जानेवारी २००५ ते ०१ जुलै २००९ |
शारीरिक पात्रता निकष (Physical Standards)
| शारीरिक निकष | पुरुष उमेदवार | महिला उमेदवार |
| उंची (नियमित पद) | १५२ सेमी | १५२ सेमी |
| उंची (संगीतकार पद) | १६२ सेमी | १५२ सेमी |
| छाती | ७७ सेमी (किमान ५ सेमी फुगवता आली पाहिजे) | लागू नाही |
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| कार्यक्रम / इव्हेंट | अग्निवीरवायु (Intake 02/2027) | अग्निवीरवायु (Musician) |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | २६ जुलै २०२६ (रात्री ११ वाजेपर्यंत) | ०२ ऑगस्ट २०२६ |
| परीक्षा / मेळाव्याची तारीख | २२ – २३ सप्टेंबर २०२६ (ऑनलाइन परीक्षा) | ३१ ऑगस्ट ते ०९ सप्टेंबर २०२६ (भरती मेळावा) |
परीक्षा शुल्क (Application Fee)
- अग्निवीरवायु इनटेक 02/2027: ₹५५०/- + GST (सर्व प्रवर्ग)
- अग्निवीरवायु म्युझिशियन: ₹१००/- + GST (सर्व प्रवर्ग)
अर्ज प्रक्रिया (Application Process)
१. उमेदवारांनी सर्वप्रथम भारतीय हवाई दलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
२. होम पेजवरील भरती संदर्भातील लिंकवर क्लिक करून स्वतःची नोंदणी (Registration) करावी.
३. अर्ज फॉर्ममध्ये सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरावी.
४. आवश्यक ती कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी.
५. आपल्या पदानुसार ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरावे.
६. अंतिम अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्यावी आणि अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवावी.
| महत्वाच्या लिंक्स: | |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसइट | Click Here |
देशाच्या संरक्षणात मोलाचे योगदान देण्याची आणि भारतीय हवाई दलाच्या शिस्तीत स्वतःचे करिअर घडवण्याची ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. जे तरुण या सर्व निकषांमध्ये बसतात, त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता शेवटच्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करावेत. योग्य नियोजन आणि सरावाच्या जोरावर या परीक्षेमध्ये यश मिळवणे सहज शक्य आहे. सर्व उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी हार्दिक शुभेच्छा!