Take a fresh look at your lifestyle.

SSC CGL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती; अर्जाची मुदत 25 जूनपर्यंत वाढवली

0

SSC CGL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (Combined Graduate Level Examination – CGL 2026) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 12,256 रिक्त जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना आता 25 जून 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

भरतीचा तपशील

  • जाहिरात क्र.: HQ-C11018/1/2026-C-1
  • परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2026 (SSC CGL 2026)
  • एकूण जागा: 12,256
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

पदांची नावे

या भरतीमध्ये असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब-इन्स्पेक्टर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड-II, ऑडिटर, अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, टॅक्स असिस्टंट यासह विविध पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

  • बहुतेक पदांसाठी: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व बारावीत गणित विषयात किमान 60% गुण किंवा सांख्यिकी विषयासह पदवी.
  • स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड-II: सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, ऑपरेशन्स रिसर्च, आयटी, संगणक विज्ञान, डेटा सायन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विषयांमध्ये पदवी.
  • असिस्टंट ऑडिट ऑफिसर: पदवीधर व संबंधित राज्याच्या प्रादेशिक/अधिकृत भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा

01 ऑगस्ट 2026 रोजी

  • 18 ते 27 वर्षे
  • 18 ते 30 वर्षे
  • 20 ते 30 वर्षे
  • 18 ते 32 वर्षे (पदानुसार)

आरक्षणानुसार सवलत:

  • SC/ST : 5 वर्षे
  • OBC : 3 वर्षे

अर्ज शुल्क

  • General / OBC: ₹100/-
  • SC / ST / PwD / ExSM / महिला उमेदवार: शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 25 जून 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
  • Tier-I परीक्षा: ऑगस्ट 2026
  • Tier-II परीक्षा: डिसेंबर 2026

महत्त्वाच्या लिंक्स

  • शुद्धीपत्रक – Click Here
  • अधिकृत जाहिरात (PDF) – Click Here
  • ऑनलाइन अर्ज – Apply Online
  • अधिकृत वेबसाइट – Click Here