Take a fresh look at your lifestyle.

SBI PO Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1500 जागांसाठी भरती; पदवीधरांना संधी

0

भारतीय स्टेट बँक (SBI) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या एकूण 1500 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 जुलै 2026 आहे.

भरतीची थोडक्यात माहिती

  • संस्थेचे नाव: भारतीय स्टेट बँक (SBI)
  • जाहिरात क्र.: CRPD/PO/2026-27/09
  • पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
  • एकूण जागा: 1500
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. पदवीच्या अंतिम वर्षात किंवा अंतिम सेमेस्टरमध्ये शिकणारे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा

01 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे.

आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट:

  • SC/ST प्रवर्ग: 5 वर्षे
  • OBC प्रवर्ग: 3 वर्षे

अर्ज शुल्क

  • General / EWS / OBC : ₹750
  • SC / ST / PwD : शुल्क नाही

निवड प्रक्रिया

SBI PO भरतीसाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे.

  • Phase I (पूर्व परीक्षा): ऑगस्ट 2026
  • Phase II (मुख्य परीक्षा): सप्टेंबर 2026
  • Phase III: ऑक्टोबर / नोव्हेंबर 2026

महत्त्वाची तारीख

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 जुलै 2026

महत्त्वाच्या लिंक्स

लिंक तपशील
जाहिरात (PDF) Click Here
ऑनलाइन अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here