Take a fresh look at your lifestyle.

संत रोहिदास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. ११ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी २०२६-२०२७ या वर्षात ‘५० टक्के अनुदान योजना’(९ लाभार्थी) आणि ‘बीज भांडवल योजना’ (११ लाभार्थी) राबविण्यात येत आहे. कर्ज या योजनेच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थींनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

कर्ज प्रस्तावासोबत अर्जदाराने जोडावयाची कागदपत्रे :-

१) जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड.

२) शैक्षणिक दाखला, तीन फोटो कॉपीज, पॅन कार्ड, लाभार्थाचा उद्योग आधार प्रमाणपत्र

३) ज्या ठिकाणी व्यावसाय करावयाचा असेल त्या जागेचा पुरावा (जागेचे लाईटबील, टॅक्स/भाडे पावती/भाडे करारनामा/जागा वापर संमती पत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा इ.)

४) कागदपत्र खरी असल्याबाबत लाभार्थ्यांचा विनंती अर्ज व ज्या जागी व्यावसाय चालू आहे त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र.

५) ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र

६) व्यावसायासबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला

७) आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, सनदी लेखापालच्या सही व शिक्यासह

८) खरेदी करावयाच्या मालमत्तेच्या साहित्याचे जी.एस.टी. क्रमांक असलेले दरपत्रक (कोटेशन).

९) अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र (रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर)

१०) अर्जदाराचे तसेच जामिनदारांचे विहीत नमुन्यातील शपथपत्र (रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर)

११) लाभार्थाचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न बैंक खाते क्रंमाक

१२) दोन सक्षम जामिनदार (नोकरदार किंवा मालमत्ताधारक/शेतकरी)

१३) सक्षम दोन जामिनदार अ २ शासकीय जामिनदारांच्या कार्यालयाचे हमीपत्र अथवा ब २ शेतकरी /मालमत्ताधारक यांचे सात बारा/नमुना क्र. आठच्या उता-यावर सक्षम अधिका-याची सही व शिक्यानुसारची उतारे सोबत सह. दुय्यम निबंधक अथवा गर्व्हमेंट व्हल्युवर यांचे सबंधित मालमत्तेचे मुल्यांकन पत्र अथवा प्रमाणपत्र आवश्यक.

अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर, होलार आदी) असावा. यापूर्वी त्याने महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्जाच्या तीन प्रती कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर, गव्हर्नमेंट लेदर वर्किंग स्कूल कंपाऊंड, खेरवाडी, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१ येथे स्वतः उपस्थित राहून मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसह कर्ज प्रस्ताव दाखल करावेत. या योजनांचा लाभ घेऊन समाजबांधवांनी आपली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई उपनगर यांनी केले आहे.