Take a fresh look at your lifestyle.

DRDO भरती २०२६: संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत सायंटिस्ट पदांची संधी; ३३ जागांसाठी भरती!

0

देशासाठी सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या आणि तांत्रिक क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) अंतर्गत ‘सायंटिस्ट’ (Scientist) पदांच्या ३३ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.

पदांचा तपशील (Total: ३३ जागा)
पद क्र. पदाचे नाव रिक्त पदे
१ सायंटिस्ट ‘E’ ०२
२ सायंटिस्ट ‘D’ ११
३ सायंटिस्ट ‘C’ २०
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
सायंटिस्ट ‘E’: संबंधित शाखेतील (Electronics/Mechanical/Aeronautical इ.) प्रथम श्रेणी B.E./B.Tech पदवीसह ११ वर्षांचा अनुभव आवश्यक.

सायंटिस्ट ‘D’: संबंधित शाखेतील प्रथम श्रेणी B.E./B.Tech किंवा M.Sc. (Physics/Photonics) पदवीसह ०७ वर्षांचा अनुभव आवश्यक.

सायंटिस्ट ‘C’: संबंधित शाखेतील प्रथम श्रेणी B.E./B.Tech किंवा M.Sc. पदवीसह ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

(टीप: शैक्षणिक पात्रतेचे पूर्ण तपशील पाहण्यासाठी खालील अधिकृत जाहिरात (PDF) तपासा.)

वयोमर्यादा (१९ जून २०२६ रोजी)
सायंटिस्ट ‘E’ व ‘D’: ४५ वर्षांपर्यंत.

सायंटिस्ट ‘C’: ३५ वर्षांपर्यंत.

(SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी ३ वर्षांची वयोमर्यादेत सवलत मिळेल.)

अर्ज शुल्क
General/OBC/EWS: १०० रुपये.

SC/ST/PWD/महिला: शुल्क नाही.

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ जून २०२६ (दुपारी ०४:०० वाजेपर्यंत).

उपयुक्त लिंक्स
जाहिरात (PDF):- https://rac.gov.in/download/advt_157.pdf
Online अर्ज :- https://rac.gov.in/drdo/public/login
अधिकृत वेबसाइट :- https://www.drdo.gov.in/drdo/