तंत्रशिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली: इंजिनिअरिंग डिप्लोमाला आता मिळणार सरकारी स्कॉलरशिपचा आधार!
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या (MSBTE) अंतर्गत इंजिनिअरिंग डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने विविध शिष्यवृत्ती आणि सहाय्य योजनांची घोषणा केली आहे. ‘मेहनत तुमची, साथ आमची!’ या ब्रीदवाक्यासह सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ठामपणे उभे असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे.

आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने खालील महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत आहेत:
🔹 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना – आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सवलत.
🔹 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती – गुणवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विशेष आर्थिक मदत.
🔹 डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात राहण्यासाठी व भोजनासाठी आर्थिक सहाय्य.
🔹 अनाथ विद्यार्थ्यांसाठी १००% शुल्क माफी – संस्थात्मक व संस्थाबाह्य अनाथ विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण फी माफ.
या योजनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणाची दारे अधिक व्यापकपणे खुली झाली आहेत.
अधिक माहिती व अर्जासाठी विद्यार्थी https://msbte.ac.in किंवा https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊ शकतात.
या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.