६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण; शासनाचे २०११ नियम लागू
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९’ (RTE) प्रभावीपणे राबवण्यासाठी ‘महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११’ जाहीर केले आहेत. हे नियम संपूर्ण राज्यात लागू करण्यात आले असून, शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर वाचा👆
या नियमांनुसार, राज्यातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य तसेच शालेय गणवेश देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, दिव्यांग (विकलांग) बालकांसाठी ही वयोमर्यादा १८ वर्षांपर्यंत वाढविण्यात आली असून, त्यांना आवश्यक ते विशेष अध्ययन साहित्य आणि सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे सर्वसमावेशक शिक्षणाला चालना मिळणार आहे.
या नियमावलीमुळे राज्यातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळणार असून, शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.