सुप्रीम कोर्टाची मान्यता! पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांची पदभरती पुन्हा सुरू
पेसा क्षेत्रातील पदभरतीला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता; १७ संवर्गातील रिक्त पदे लवकरच भरली जातील.
सुप्रीम कोर्टाच्या दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ आणि १७ नोव्हेंबर २०२५ निर्णयानंतर, पेसा क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गांच्या पदभरतीस शासनाने मंजुरी दिली आहे. आदिवासींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण ठरवून पदे सरळसेवा व खुल्या प्रवर्गात भरली जातील. पूर्वीच्या जाहिरातीतील पात्र उमेदवार व मानधन तत्वावर नियुक्त उमेदवारांना प्राधान्य दिल्यानंतर उर्वरीत पदांची भरती सुरू होणार आहे. सदर प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयानुसार होईल.
वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर GR वाचा👆