उच्च शिक्षणासाठी परदेशात झेप; आदिवासी विद्यार्थ्यांनी तत्काळ अर्ज करावेत
राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडी, पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी ४० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.
शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, विमान प्रवास, व्हिसा शुल्क, आरोग्य विमा तसेच शैक्षणिक आकस्मिक खर्चाचा समावेश आहे. लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असावे व विद्यापीठाचे QS वर्ल्ड रँकिंग २०० च्या आत असणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार उत्पन्न मर्यादा १० लाखांपर्यंत व रँकिंग ३०० पर्यंत शिथिल केली जाईल.

विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा ३५ वर्षे तर पीएचडीसाठी ४० वर्षे आहे. TOEFL/IELTS परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य असून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.