Take a fresh look at your lifestyle.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

0

शून्य (०) ते अठरा (१८) वर्षे वयोगटातील बालकांच्या संगोपनासाठी राज्य शासनाची महत्त्वाची सेवा योजना महाराष्ट्र शासनाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही शहर व ग्रामीण भागातील सर्व गरजू बालकांसाठी आहे. या योजनेसाठी बांधकाम कामगारच असणे आवश्यक नाही. या योजनेचा बालकांना अठरा वर्षापर्यंत दरमहा 2250 रुपये लाभ कोणाला मिळू शकतो.

पात्रता- 

✔️ ज्या बालकांचे आई किंवा वडील किंवा दोघांचेही निधन झाले आहे

✔️ अनाथ, निराधार, निराश्रित बालक

✔️ दुर्धर आजारग्रस्त बालक किंवा दुर्धर आजारग्रस्त पालकांचे पाल्य

✔️ कर्करोग, कुष्ठरोगग्रस्त पालकांचे बालक

✔️ कारागृहातील कैद्यांचे पाल्य

✔️ तीव्र मतिमंद, अंध, दिव्यांग बालक

✔️ ४०% पेक्षा अधिक अपंगत्व असलेली बालके

✔️ तीव्र कुपोषित बालके

✔️ कौटुंबिक कलहामुळे बाधित बालक

✔️ लैंगिक अत्याचार पीडित बालक

✔️ कोविड–१९ मुळे पालक गमावलेली बालके

अर्ज कुठे करावा- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी