शेतरस्त्यांची नोंद आता ‘इतर हक्कात’ केली जाणार -महसूल विभागाचा निर्णय

भारतीय कृषी समाजात शेती हा केवळ उपजीविकेचा नव्हे, तर एक जीवनशैलीचा अविभाज्य भाग मानला जातो. याच कृषी संस्कृतीच्या केंद्रस्थानी ‘शेतरस्ता’ हा विषय अत्यंत महत्वाचा असून, शेतीसाठी पोहोचाचा रस्ता असणे ही मूलभूत आवश्यकता आहे. मात्र गेल्या अनेक दशकांपासून पारंपरिक पायवाटा, बैलवाटी आणि नैसर्गिक रस्ते वापरले जात होते. परंतु, सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगात हे मार्ग अपुरे पडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, जो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो शेतरस्त्यांची अधिकृत नोंद-7/12 उताऱ्यावर इतर हक्कांत करण्यात येणार आहे.