‘मातृवंदना’ योजने साठी मदत हवी, तर डायल करा ‘हा’ टोल फ्री नंबर
पोषण आणि पंतप्रधान मातृवंदना योजनेसाठी महिला आणि बालविकास ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ मंत्रालयाने क्रमांकात बदल केला आहे. सध्याच्या १४ हजार ४०८ याऐवजी आता नवीन हेल्पलाइन क्रमांक १५१५ असा असणार आहे. १ नोव्हेंबरपासून हा नवीन मदत क्रमांक देशभरात सुरू झाला असून, यामुळे योजनेची माहिती घेणे, अर्ज स्थिती तपासणे आणि तक्रार नोंदवणे अधिक सुलभ होणार आहे.
काय आहे मातृवंदना योजना:- पंतप्रधान मातृवंदना योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेचा उद्देश गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना आर्थिक साहाय्य प्रदान करणे हा आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या पहिल्या दोन जिवंत अपत्यांसाठी (दुसरे अपत्य मुलगी असल्यास) थेट त्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम दिली जाते.
योजनेचा लाभ कसा घ्यायचा:- योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांनी अंगणवाडी केंद्र किंवा मान्यताप्राप्त आरोग्य सुविधा केंद्रात आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी करणे आवश्यक आहे.
हेल्पलाइनवर अर्जाची स्थिती कळणार:- नवीन टोल फ्री क्रमांक १५१५ च्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती सहजपणे कळू शकेल. यासाठी त्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
कोणत्या महिलांना मिळते मदत:- वयाची १९ वर्षे पूर्ण झालेल्या गर्भवती महिला आणि स्तनदा माता. केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या महिला (वेतन रजा घेणाऱ्या) वगळता इतर सर्व पात्र असतात. एससी एसटी प्रवर्गातील महिला, बीपीएल शिधापत्रिकाधारक, मनरेगा जॉब कार्डधारक आणि वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी ही योजना आहे.

पहिला हप्ता ३ हजारांचा, दुसरा २ हजारांचा पंतप्रधान मातृवंदना योजनेंतर्गत पहिल्या जिवंत अपत्यासाठी एकूण ५ हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये दिले जातात. विविध टप्प्यानुसार ही मदत दिली जाते.