भारताच्या ३ दलांमध्ये परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी सूचना…
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक नवयुवतींसाठी १९ जानेवारी २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६६ आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावे, असे मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डीः training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन, मुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
