बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत शिष्यवृत्ती योजनेची महत्वाची माहिती जारी!
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत “शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज प्रकरण, अर्ज स्वीकृती, बँक खात्यामध्ये रक्कम हस्तांतरण” अशा आशयाची खोटी माहिती समाज माध्यमांद्वारे प्रसारित होत आहे.

यू ट्यूबवरील ‘Brown Mulga’ या चॅनेलद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या मंडळाचे बांधकाम कामगारांसाठी e-KYC हा व्हिडिओ चुकीच्या माहितीवर आधारित बनविण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दाखविण्यात आल्याप्रमाणे उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने e-KYC संदर्भात दि.०५.११.२०२५ अथवा दि.११.११.२०२५ रोजी कोणताही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही तसेच याबाबत मंडळाचे अधिकृत परिपत्रक /संकेतस्थळावर संदेश प्रसारित केलेले नाही. तरी बांधकाम कामगारांनी याबाबत अधिकृत माहितीकरिता मंडळाचे संकेतस्थळ, अथवा नजीकच्या तालुका सुविधा केंद्राशी संपर्क साधावा.
