अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अनुदान योजना सन २०२५-२६
अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक बहुल शासनमान्य प्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अनुदान योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर (जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१) येथे १४ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे अथवा दूरध्वनी: ०२२-२२६६०१६७, ई-मेल: dpomumbaicity@gmail.com यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
