Take a fresh look at your lifestyle.

आर्थिकदृष्ट्या मागास तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

0

आर्थिकदृष्ट्या मागास तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने बँक कर्जावरील व्याज परतावा योजना, लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व मार्गदशन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. महामंडळाकडून विविध जिल्ह्यांमध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे महामंडळाच्या माध्यमातून तयार झालेल्या उद्योजकांच्या व्यवसाय वाढीस मदत होणार आहे. हा उपक्रम तरुण उद्योजकांना व्यवसाय यशस्वीपणे चालविण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.

या उपक्रमातंर्गत महामंडळाच्या वतीने नुकतेच ‘पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय’ या विषयावर उद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले हाते. त्यात राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेबिनारमध्ये पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले. राज्यभरातून अनेक युवक, महिला उद्योजिका व स्वयंसहायता गटांचे प्रतिनिधी या वेबिनारला ऑनलाईन उपस्थित होते.