विभागीय पोलीस तकार प्राधिकरण, नागपूर विभाग येथे भरती
पदाचे नाव: गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी, अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक
शैक्षणिक पात्रता- गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी: सदर पदासाठी गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी पात्र ठरतील. तसेच सदर पदासाठी सहायक पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक /उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यास प्राधान्य राहील. (सदर पदांवर सध्या कार्यरत असलेले तपास अधिकारी यांचा कार्यकाल संपल्यावर यथावकाश नियुक्ती देण्यात येईल.)
अधीक्षक: सदर पदासाठी शासकीय सेवेतुन अधीक्षक किंवा तत्सम अराजपत्रित /राजपत्रित गट-ब पदावरून सेवानिवृत्त झालेले ०३ वर्षाचा अनुभव असलेले कार्यालयीन अधिकारी पात्र ठरतील. न्यायालयीन प्रक्रियेचा अनुभव असलेले सेवानिवृत्त कार्यालयीन अधिकारी यांना प्राधान्य राहील.
उच्च श्रेणी लघुलेखक: सदर पदासाठी शासकीय सेवेतुन ०३ वर्षाचा अनुभव असलेले उच्च श्रेणी लघुलेखक किंवा तत्सम अराजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग १२० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ४० श.प्र.मि. तसेच इंग्रजी लघुलेखनाचा १०० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. असलेले पात्र ठरतील. न्यायालयीन प्रक्रियेचा अनुभव असलेले सेवानिवृत्त उच्च श्रेणी लघुलेखक यांना प्राधान्य राहील.
पद संख्या: 05 पदे
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर विभाग, नागपूर, प्रशासकीय ईमारत क्र. २, तिसरा माळा, बी-विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर
अर्ज करण्याची मुदत: 18 ऑगस्ट 2025.
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ११:०० वाजता.
मुलाखतीची पत्ता: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर विभाग, नागपूर, प्रशासकीय ईमारत क्र. २, तिसरा माळा, बी-विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर
अधिकृत वेबसाईट- nagpurpolice.gov.in