सन्मान सातत्य कायम ठेवल्याचा; आयु.योगेशजी नन्नवरे यांच्या कार्याचा गौरव…

जीवनात परिवर्तन हवे असेल, तर आपल्या प्रत्येकामध्ये असणारा ‘कृष्ण’ आपल्याला जागवावा लागेल.आपल्या तत्वांचा, नीतीनियमांचा आणि सामाजिक विचारांचा सुक्ष्मार्थं लावून ‘कृष्णाने’ जटील समस्यासोडविल्या होत्या.
बलाढ्य कौरवांना अद्दल घडवून त्याने मोठ्या बदलाचा प्रारंभ केला. सुरवातीस श्रीकृष्णाकडे ना सैन्य होत, ना कोणती सामग्री… पण, तरीही कृष्ण कुठेच थांबला नाही. साहस, प्रचंड श्रम आणि उत्तम नेतृत्वगुणांसह कृष्ण पुढेच जातं राहिला.
लेखन- चेतन निंबोळकर, जळगांव
राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन यंदा ‘महसूल सप्ताह २०२५’ अंतर्गत जिल्हा स्तरावर विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला.
या सोहळ्यास पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश (राजू मामा) भोळे , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात महसूल विभागातील विविध पदांवर कार्यरत असलेल्या उल्लेखनीय सेवा देणाऱ्या ७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यामध्ये आयु.योगेशजी नन्नवरे – सहायक महसूल अधिकारी, चोपडा यांचा महत्त्वपूर्ण बाबतीत उल्लेखनीय योगदाना बद्दल मान्यवारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नागरिकाभिमुख व पारदर्शक सेवा हेच विभागाचे खरे ब्रीद असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रामाणिक व सेवाभावी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचा संदेश या सोहळ्यातून अधोरेखित करण्यात आला.