Take a fresh look at your lifestyle.

प्रशासनाचा मोठा निर्णय! जमिनींच्या खरेदी-विक्रीसाठी ‘या’ कागदपत्राची गरज भासणार नाही

0

शेतजमिनीच्या खरेदी-विक्री प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आला आहे. जर जमीन दस्तामध्ये मिळकतीची ओळख पटविण्यासाठी पुरेसे वर्णन नमूद केलेले असेल आणि ती जमीन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसेल, तर अशा दस्तासाठी मोजणी नकाशा जोडण्याची गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर झाली आहे. शेतजमिनीच्या खरेदी-विक्री दस्तामध्ये पूर्वीप्रमाणेच मिळकतीचे ओळख पटविणारे पुरेसे वर्णन नमूद केले असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, दस्त नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादीही पूर्ववतच ठेवण्यात आली आहे.

या निर्णयाचा थेट फायदा जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. मोजणी नकाशा मिळवण्यासाठी लागणारा वेळ, श्रम आणि खर्च आता वाचणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि जमीन व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बाब आहे.