विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी; जळगाव जिल्हा परिषदेची मोफत अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली!
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
जळगाव जिल्हा परिषदेची मोफत अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली!
विद्यानिकेतन शाळा, शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे जिल्हा परिषदेतर्फे सुरु करण्यात आलेली मोफत अभ्यासिका विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळवत आहे.
शुक्रवार, दि. 13 जून, सकाळी 11 वाजता
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल या स्वतः या अभ्यासिकेला भेट देणार असून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
शांत आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण
मार्गदर्शनासाठी विशेष भेटी
प्रेरणादायी उपक्रम
शिक्षण आणि संधी यांच्या दारात आता फक्त एक पाऊल उरलं आहे – या संधीचा जरूर लाभ घ्या!
स्थळ :- शिवतीर्थ मैदान, विद्यानिकेतन शाळा
वेळ :- शुक्रवार दि. 13 जून सकाळी 11 वाजता