राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थामध्ये दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता
राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थामध्ये दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता– आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक १ ते २ येथील शासन निर्णयान्वये तसेच वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशांन्वये सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपरोक्त संदर्भ क्र.१ अन्वये आरोग्य संस्थांचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले की पदनिर्मिती करावी, असे शासनाचे धोरण आहे. तसेच अनुक्रमांक ३ व ५ येथील शासन निर्णयान्वये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. ज्या आरोग्य संस्थांचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे, अशा रुग्णालयांच्या ठिकाणी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः – राज्यातील ७५ टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण ८६ आरोग्य संस्थांकरीता ८३७ नियमित पदे व १२३३ एवढी पदे (कुशल/ अकुशल) बाह्ययंत्रणेव्दारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.