Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात भरती

0

भारत सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, अमन निर्माण भवन, मौलाना आझाद रोड, नवी दिल्ली, ११००११ जाहिरात – नॅशनल कमिशन फॉर अलाईड अँड हेल्थकेअर प्रोफेशन (एनसीएएचपी)च्या सचिव पदाकरीता २०.०२.२०२५ पासून २२.०३.२०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्जदार अर्ज स्वीकारण्याच्या अंतीम तारखेनुसार ६५ वर्षे वयापेक्षा कमी वयाचा अवश्य असावा.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २२.०३.२०२५ राहील.

सविस्तर जाहीरात आणि अर्जाचा नमुना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईट https://mohfw.gov.in वर प्रकाशित करण्यात येईल आणि ते डाऊनलोड करता येऊ शकेल.

विहीत नमुन्यामध्ये रीतसर भरलेला अर्ज सर्व संबंधित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसहित लिफाफ्यावर “एनसीएएचपीच्या सचिव पदाकरीता अर्ज” असे उपरिलिखित करुन खालील पत्त्यावर पाठवावाः

सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, निर्माण भवन, मौलाना आझाद रोड, नवी दिल्ली, ११००११.

सर्व संबंधित दस्तऐवजांसहित अर्जाच्या स्कॅन केलेल्या प्रती ईमेल पत्ताः ahssection-mohfw@gov.in वर अवश्य पाठवाव्यात.

हार्ड प्रत आणि ऑनलाईन अर्ज दोन्ही उमेदवारीचा विचार करण्यासाठी अनिवार्य आहे. स्कॅन केलेल्या ऑनलाईन प्रतीचा अंतिम अर्ज म्हणून विचार करण्यात येईल आणि ते निर्देशित ईमेल पत्त्यावर नियत तारीख व वेळेपूर्वी अवश्य प्राप्त व्हायला हवे.