लाडक्या बहिणींनो फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्वाची माहिती
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये बँक खात्यात जमा होतात.
आता या योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना आता जास्त वेळ प्रतिक्षा करावी लागणार नाही.
कारण फेब्रुवारीचा हफ्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली.
तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, फेब्रुवारी महिन्याच्या निधीसाठीच्या चेकवर सही केली असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच महिलांना खुशखबर मिळणार आहे.