Take a fresh look at your lifestyle.

‘विधि’च्या प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल; २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

0

विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आणि मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सत्र ६ ची परीक्षा एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाची २० व २१ मार्च रोजी होणारी प्रवेश परीक्षा ३ व ४ मे रोजी घेण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) घेतला आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

प्रवेश परीक्षेच्या अर्ज नोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षा २० व २१ मार्च रोजी घेण्यात येणार होती. मात्र मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सत्र ६ ची परीक्षा असल्याने ही परीक्षा पुढे ढकल्याचा निर्णय घेण्यात आला.