विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दुसऱ्या टप्प्यात ७२०० पदांची पोलीस भरती होणार -गृहमंत्र्यांची माहिती
पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर असून महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात तब्बल ७२०० पदांची पोलीस भरती होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माहिती देतांना सांगितलं आहे की , राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली होती. यामध्ये ५ हजार ७०० पदे भरलेली होती. आता दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २०० पदे लवकरच भरली जाणार आहेत.