Take a fresh look at your lifestyle.

जळगाव जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन

0

जळगाव- जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, वरील योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे (Fresh) नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज भरण्यास दि. 31 जानेवारी, 2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दि. 31 जानेवारी, 2022 पर्यंत https;//mahadbtmahait.gov.in या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाईन भरावेत. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी तसेच कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्य यांनी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.