Take a fresh look at your lifestyle.

महाफूड भरती- २०२३ पुरवठा निरीक्षक प्रमाणपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर

0

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग जाहिरात क्रमांक : प्र.क्र.६३/२०२२

पुरावठा निरीक्षक, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-२०२३ – पदवीधर अंशकालीन उमेदवार: कागदपत्र पडताळणी प्रक्रिया 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, पुरवठा निरीक्षक, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती – २०२३ सर्वसाधारण गुणवत्ता यादी, दिनांक १९ जून, २०२४ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्यामध्ये पदवीधर अंशकालीन उमेदवार असल्याचा दावा केलेल्या व पदवीधर अंशकालीन उमेदवार असल्याचे विहित प्राधिकाऱ्यांनी/तहसिलदार यांनी दिलेले वैध प्रमाणपत्र असणाऱ्या सर्व उमेदवारांची संबंधित वैध प्रमाणपत्र पडताळणी त्यांच्या विभागातील उप आयुक्त (पुरवठा) कार्यालयात दि.२०.०१.२०२५ ते दि.२२.०१.२०२५ दरम्यान राबविण्यात आली आहे.

सदर पडताळणीस मिळालेला प्रतिसाद पाहता प्रकरणी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत नमूद पदवीधर अंशकालीन उमेदवार असल्याचा दावा केलेल्या सर्व उमेदवारांना (यापूर्वी प्रमाणपत्र पडताळणी झालेले उमेदवार वगळून) संबंधित वैध प्रमाणपत्र पडताळणी त्यांच्या विभागातील उप आयुक्त (पुरवठा) कार्यालयात दि.२९.०१.२०२५ ते दि.३१.०१.२०२५ व दि.०३.०२.२०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.