Take a fresh look at your lifestyle.

‘CET’ नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ…

0

बारावी परीक्षेनंतर विविध व्यावसायिक, तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांची नोंदणी राज्य सीईटी कक्षाने लवकर सुरू केली असली तरी बहुतांश परीक्षांना विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यापैकी काही परीक्षांच्या नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी कक्षा २५ डिसेंबरपासून ६ जानेवारीपर्यंत १७ विविध सीईटी परीक्षांसाठीच्या अर्ज नोंदणीला सुरुवात केली. यापैकी एमपीएड, एमएड, एमसीए, एचएमसीटी, बीएचएमसीटी या परीक्षांची मुदत आज संपुष्टात येणार होती. बीबीए-बीसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीची नोंदणी २ जानेवारीपासून सुरू झाली. या नोंदणीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत आहे. मात्र, गेल्या २३ दिवसांमध्ये फक्त १५ हजार ८२१ विद्यार्थ्यांनीच या परीक्षेसाठी अर्ज नोंदवले आहेत. १० हजार ९८९ इतक्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्जनिश्चिती केली आहे. विद्यार्थ्यांनी बीबीए – बीसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी विहित मुदतीत अर्ज दाखल करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.