Take a fresh look at your lifestyle.

आपल्याला नवीन उद्योग सुरु करायचाय? तर शासनाच्या ‘या’ योजनेचा लाभ नक्की घ्या

0

आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा नवा उद्योग करण्याचा विचार येत असेल तर संबंधित उद्योगासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) सदर योजनेचा लाभ घेऊन तुम्ही राज्य शासनाकडून 1 लाख ते 50 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता आणि आपल्या पंखांना बळ देऊन नवी भरारी घेऊ शकता.

अनेकांना कोणता ना कोणता उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची आवड असतेच. परंतु नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येतात. बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारही असे योजना आणते पण त्याची पुरेशी माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. योजना पोहोचल्या तरी त्याची पुर्तत: करण्यासाठी नाकी नऊ येतात. त्यामुळे तरुण उद्योगांकडे येत नाहीत. अशीच एक योजना आहे ती म्हणजे ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (CMEGP). या योजनेचा लाभ घेतला तर अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजनेचा १८ ते ४५ वयोगटातील लाभ घेऊ शकतात. सरकारने रोजगार मिळवून देण्यासाठी ही योजना आणली. उद्योग, व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील त्यांना ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)’ या योजनेतंर्गत मदत मिळू शकते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी ज्या तरुणांना नवीन उद्योग सुरू करायचे आहेत. त्यांनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) ‘ योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ खालील महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.

अधिकृत संकेतस्थळ 👇

https://maha-cmegp.gov.in/onlineapplication