Take a fresh look at your lifestyle.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव येथे उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन…

0

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव येथे जिल्हास्तरीय पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ठेवण्यात आला आहे.

• जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयामार्फत दिनांक १६/०१/२०२५ रोजी जिल्हयातील सुशिक्षीत उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आलेले आहे. या संधीचा जिल्हयातील युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन संदीप ज्ञा.गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केलेले आहे.

रोजगार मेळाव्याचे ठिकाण – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव