पीक विमा योजनेचा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा – कृषी विभागाचे आवाहन
पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी रु. १/- रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सीएससी (CSC) केंद्रामध्ये भरू नये. शेतकऱ्यांकडून रु. १ पेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टोल फ्री क्रमांक :- १४४११ / १८००१८००४१७
तक्रार नोंद क्रमांक :- ०२२-४१४५८१९३३ / ०२२-४१४५८१९३४
व्हाट्सअॅप क्रमांक :- ९०८२९२१९४८
इमेल आयडी :- support@csc.gov.in