Take a fresh look at your lifestyle.

वन विभागाची ‘अमृतवृक्ष’ आपल्या दारी योजना…

0

केंद्र शासनाच्या “एक पेड माँ के नाम’ योजनेची देखील पूर्तता व्हावी तसेच राज्याने यापूर्वी अवलंबिलेले वृक्ष लागवडीचे धोरण अखंडपणे पुढेही चालू राहावे आणि या कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामुहिक पडीक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा तसेच सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना माफक दरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वन महोत्सवाच्या कालावधीत “अमृतवृक्ष आपल्या दारी” योजना राबविण्याच्या उद्देशाने सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.