मोफत लेडीज ब्युटी पार्लर प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी…
बँक ऑफ इंडिया द्वारा पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक 01/04/2024 ते 30/04/2024 या 30 दिवसांच्या कालावधीत स्वत:चा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिलांसाठी लेडीज ब्युटी पार्लर प्रशिक्षण मोफत आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात आय ब्रो, ब्लीच, फेशियल, मॅनिक्युअर, पेडीक्युअर, स्कीन केअर, हेअर कट – (बेसिक,ऍडव्हान्स ,चिल्ड्रन), मेहंदी डाय, हेअर कलर, हेड मसाज, साडी ड्रेपिंग, हेअर स्टाईल, मेकअप, ब्रायडल मेकअप, ब्रायडल हेअर स्टाईल, ब्रायडल मेहंदी, हेअर स्ट्रेटनिंग, रिबॉडिंग, हर्बल हेअर, स्कीन प्रोडक्ट, बॉडी मसाज, हेअर स्पा, टॅटू, इ. प्रकार प्रात्यक्षिकासह शिकविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षणात प्रात्यक्षिकासोबतच व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय सक्षमता, उद्योजकीय विकास,संभाषण कौशल्य,बँकेच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल.

प्रशिक्षण हे सलग 30 दिवस असून सकाळी 09:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेत होईल. एकूण ३५ प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण हे मोफत असून चहा,नाष्टा,जेवण आणि निवासाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षणासाठी 18 ते 45 वयोगटातील रत्नागिरी जिल्यातील दारिद्रय रेषेखालील व्यक्ती किंवा उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा SECC लाभार्थी किंवा MGNREGA लाभार्थी या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. अर्ज भरणासाठी येताना 1 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, पॅनकार्ड झेरॉक्स, मतदानकार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स, उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांचा कुटुंबातील सदस्य असल्यास उमेद अभियान यांचेमार्फत देण्यात येणारे शिफारस पत्र, दारिद्रय रेषेखाली नाव असल्यास दारिद्रय रेषेखाली असल्याचा दाखला कार्यालयीन वेळेत घेवून येणे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28/03/2024 आहे. निवड झालेल्या उमेदवारांना फोनद्वारे कळविण्यात येईल. प्रशिक्षणाचा व अर्ज भरण्याचा पत्ता – स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला, साई नगर, आर.टी.ओ. रोड, कुवारबाव. रत्नागिरी. ( शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी. 11 ते सायंकाळी 05 या वेळेत 02352 -299191 / 9284034438 मोबाईल क्रमांकावर संपर्क करणे )