राज्यातील ‘या’ कुटूंबांना मिळणार सवलतीच्या दराने अख्खा चणा; शासन निर्णय जारी
१. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना अख्खा चणा (फिल्टर्ड) ₹५५/- प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका १ किलो याप्रमाणे १ किलोच्या पॅकेटमध्ये वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. केंद्र शासनाकडून अनुदानित दराने प्राप्त होणारा प्रतिमाह १६००० मे. टन याप्रमाणे तीन महिन्यांकरीता ४८००० मे. टन अख्ख्या चणा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरण करण्याकरीता जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांच्याकडून आवश्यक अख्ख्या चण्याची मागणी प्राप्त करून घेऊन तद्नंतर वितरणाचा कालावधी व जिल्हानिहाय नियतनाचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.