Take a fresh look at your lifestyle.

दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम पाच लाखांपर्यंत कर्ज…

0

दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अंपग वित्त व विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. पाच लाखांपर्यंतचे कर्ज २ टक्के व्याज दराने देण्यात येत आहे.

दिव्यांगांना ५० हजारांपासून पाच लाखांपर्यंत कर्ज…

दिव्यांग व्यक्त्तीला आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावे, त्यांनी स्वयंरोजगार निर्माण करावा यासाठी ५० हजारांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंत या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

वर्षाला २ टक्के व्याजाचा आहे दर…

■ दिव्यांगांनी घेतलेल्या कर्जावर फारसे व्याजही लावले जात नाही. वार्षिक २ टक्के व्याजदर आकारला जातो.

■ त्यामुळे दिव्यांगांनी घेतलेल्या कर्जाची ही वेळेवर परतफेड होत आहे.

कोणकोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज….

दिव्यांग अर्जदार कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज मागणी करू शकतो. कर्ज देण्यासाठी कोणत्याही ठराविक व्यवसायाची अट नसल्याचे अंपग वित्त व विकास महामंडळाच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

कागदपत्रे काय लागतात…

आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, बँकेचे पासबुक, रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, कर्जबाजारी नसल्याबाबत ना देयक प्रमाणपत्र, वयाचा दाखला, व्यवसाय करत असल्याची माहिती, व्यवसायाची जागा भाड्याने असल्यास १०० च्या बाँड पेपरवर मालकाची संमतीपत्र आवश्यक असते.