Take a fresh look at your lifestyle.

मत्स्यव्यवसायीक कामगारांनी ‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे सहाय्यक आयुक्तांचे आवाहन

0

केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या ई-श्रम पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय अनुषांगिक कामाशी प्रत्यक्ष सहभाग असलेले कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त जे. एस. पटेल यांनी केले आहे.

असंघटित क्षेत्रातील मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय अनुषांगिक कामाशी प्रत्यक्ष सहभाग असलेले कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांचे कवच मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाने ई-श्रम संकेतस्थळा सुरु केले आहे. श्रमिकामधील अत्यंत वंचित घटकाला ई-श्रम संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख आणि संघटित रूप मिळवता येणार आहे.

केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या https://register.eshram.gov.in/#/user/selfया पोर्टलवर राज्य सरकार, कामगार संघटना आणि सामाईक सेवा केंद्र यांच्या मदतीने मत्स्यकामगारांची नोंदणी केली जाणार आहे. मत्स्यव्यवसायाशी संबंधित कामगारांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बँक खात्याचा तपशील इत्यादी माहितीसह नोंदणी करता येईल.