Take a fresh look at your lifestyle.

महिला किसान योजना…

0

महिला किसान योजना – अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.

योजनेचा प्रकार :- केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना

योजनेचा उद्देश :- अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव:- अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.

योजनेच्या प्रमुख अटी :- अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.

अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा. (अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.

(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.

जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.

अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.

महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.

लाभाचे स्वरुप :- या योजने अंतर्गत ज्या महिलांच्या नावे शेत जमिनीचा सात/बाराचा उतारा आहे किंवा पतिपत्नी या दोघांच्या नावावर सात/बारा उतारा आहे अथवा पतीच्या नावांवर सात/बारा उतारा आहे व त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञा पत्रा-ारे आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नांवे कर्ज मंजूर करुन घेण्यास तयार असेल अशा महिला लाभार्थीस रु.५००००/ पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये रु.१००००/ अनुदान व उर्वरित रक्कम रु.४००००/ कर्ज स्वरुपात ५ टक्के व्याज दराने मंजूर करण्यांत येते. सदर कर्ज हे फक्त शेतीसाठी अथवा शेतीपूरक व्यवसायासाठीच देण्यांत येते.

अर्ज करण्याची पध्दत :- अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.