Take a fresh look at your lifestyle.

वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी आता २० नोव्हेंबर रोजी

0

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे परिवहन संवर्गातील विविध वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी 15 नोव्हेंबर 2023 रोजी होणार होती. मात्र या दिवशी भाऊबीजनिमित्त सार्वजनिक सुटी आहे. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी आता 20 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.