विद्यार्थ्यांसाठी ‘या’ योजनेद्वारे मिळणार 20 रुपयात मिळणार 5 लाखांपर्यंत फायदा…
राज्य सरकार विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. अशातच सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट इन्शुरन्स योजना जाहीर केली आहे. ही योजना शाळकरी मुलांपासून ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या योजनेची प्रीमियम सुविधा 20 रुपयांपासून सुरु होत आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने 16 ऑक्टोबर 2023 रोजी ही योजना जाहीर केली आहे.
प्रीमियमसाठी किती पैसे भरावे लागतील :- या विमा योजनेसाठी 20 रुपये प्रीमियम भरुन एका विद्यार्थ्याला 1 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. ही पॉलिसी वर्षभरासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच जर 62 रुपयांचा प्रीमियम घेतल्यास 5 लाखांचा कव्हरेज वर्षभरासाठी मिळेल. तसेच अपघातानंतर उपचारांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल कव्हरेज हवे असल्यास 422 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.

विमा कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार :- या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा प्राथमिक विमाधारक सदस्य असून महाराष्ट्राच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबध्द, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांमध्ये शिकणारा असावा. तसेच याचा प्रवेश अर्ज हा शाळा आणि कॉलेजवर अवलंबून असेल.
कोणत्या बँकेतून मिळणार विमा :- ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड कंपनीची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे.