Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रेल्वेच्या ‘या’ नियमाची आपणास माहिती आहे का?

0

दररोज अनेक लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र जर रेल्वे अपघातात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना रेल्वे विभागाकडून मदत दिली जाते. कारण जेव्हा तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक करता तेव्हा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तुमच्या तिकिटाचा विमा काढला जातो. तसेच जर ऑनलाइन तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल प्राप्त होतो त्यामध्ये विम्याचा संपूर्ण तपशील असतो.

रेल्वे अपघातात जर एखाद्याचा मृत्यू झाला तर मृताच्या नातेवाईकांनी 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाते. तसेच जर प्रवासादरम्यान प्रवासी जखमी झाल्यास त्याच्या उपचारासाठी दोन लाख रुपये दिले जातात. याशिवाय जर एखादी व्यक्ती अंशतः अपंग असेल तर ही रक्कम 7.5 लाख रुपयांपर्यंत वाढते. तसेच भारतीय रेल्वे विभाग वेळोवेळी लोकांना या सुविधांबद्दल जागरूक करत असते. त्यामुळे प्रवाशांना यासंदर्भातली माहिती असणं महत्वाचं आहे.