Take a fresh look at your lifestyle.

महामेष योजनेतंर्गत 20 मेंढ्या व 1 मेंढा वाटप योजना…

0

महामेश मेंढी गट वाटप योजनेसाठी पात्रता

या योजनेचा लाभ फक्त भटक्या जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना घेता येईल.

या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यावयाचा असेल तर तुमचे वय 18 ते 60 वर्ष इतके असावे.

या योजनेत महिलांसाठी 30 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे.

या योजनेत अपंग नागरिकांसाठी 3 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे.

या योजनेच्या माध्यमातून भटक्या जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांचे बचत गट असतील पशुपालक उत्पादक कंपन्या असतील तर त्यांना प्रामुख्याने प्राधान्य दिले जाईल.

ज्या नागरिकांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला असेल त्या नागरिकांना आता या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.

पशुसंवर्धन विभागाकडून मागील 3 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारच्या योजनेचा नागरिकांनी जर लाभ घेतलेला असेल तर त्या नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.

कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराकडे शेड बांधण्याकरिता स्वतःची जागा असणे आवश्यक आहे.

अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय , निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेत , सेवानिवृत्त , वेतनधारक तसेच केंद्र शासन , राज्य शासन , पदाधिकारी कोणत्याही प्रकारचा कर्मचारी नसावा.

महामेश मेंढी गट वाटप योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ

या योजनेच्या माध्यमातून मेंढी पालन करण्यासाठी 20 मेंढ्या व 1 नर मेंढा अशा प्रकारे गट वाटप करण्यात येते.

या योजनेच्या माध्यमातून मेंढी पालन करण्यासाठी सुधारित प्रजातीच्या मेंढ्या पालन करण्यासाठी 75 टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येते.

मेंढ्यांसाठी खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून 75 टक्के अनुदान देण्यात येते.

मुरघास करण्याकरिता 50 टक्के अनुदान देण्यात येते.

या योजनेच्या माध्यमातून पशुखाद्य उभारण्याकरिता 50 टक्के अनुदान देण्यात येते.

महामेष मेंढी पालन योजना अंतर्गत अर्ज कोण करू शकतो:-

महामेष मेंढी पालन योजना महाराष्ट्र अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती म्हणजेच भज-क या प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यातील व्यक्तींना अर्ज करता येणार आहे.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 15 नोव्हेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून Google Play Store वरून Mahamesh Application डाऊनलोड करावे लागेल तुम्ही येथून देखील अर्ज करू शकता.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन देखील अर्ज करू शकता.