शिक्षकेतर कर्मचारी सरळसेवा पदभरती बाबत शुद्धिपत्रक जारी….
संदर्भ: विद्यापीठाद्वारे प्रकाशित जाहिरात क्रमांक रातुमनावि/ सा.प्र./ ११२३, दिनांक ३ फेब्रुवारी २०२३
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा पदभरतीबाबत प्रकाशित करण्यात आलेल्या उपरोक्त संदर्भिय जाहिरातीत, प्रत्येक पदनामातील उमेदवाराच्या वयोमयदिविषयी अ.क्र. ३ मध्ये नमूद केलेली “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या एकत्रित वैतनिक कर्मचारी तसेच कंत्राटी पद्धती किंवा विविध योजनेअंतर्गत विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही” ही बाब या शुद्धीपत्रकान्वये संदर्भिय जाहिरातीतून वगळण्यात येत आहे, याची कृपया सर्व संबंधितानी नोंद घ्यावी.
तसेच संदर्भिय जाहिरातीतील सहायक कुलसचिव या पदनामातील अनुभवामध्ये नमूद केलेली, “अधीक्षक/ कक्षाधिकारी (सर्वसाधरण) अथवा समकक्ष पदावरील किमान तीन वर्षांचा प्रशासकीय कामाचा अनुभव” ही बाब वगळण्यात येत असून त्याऐवजी अनुभवामध्ये खालील अट कृपया वाचण्यात यावी.
“अधीक्षक/ कक्षाधिकारी (सर्वसाधारण)” अथवा समकक्ष पदावरील वेतन बैंड रू. ९३००-३४८००/- ग्रेड वेतन रु. ४४००/- मधील किमान तीन वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव”