दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमातून “पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन” पदविका अभ्यासक्रम
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरअंतर्गत महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक खाजगी संस्थाद्वारे विनाअनुदानित तत्त्वावर, इयत्ता दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांकरिता मराठी माध्यमातून “पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन ” द्विवर्षीय पदविका अभ्यासक्रम राबविला जातो. अभ्यासक्रमाच्या सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राचे प्रथम वर्ष प्रवेश केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे ऑनलाइन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. त्याकरिता माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज, प्रथम वर्ष प्रवेशाकरिता पात्र पदविका विद्यालयांची यादी व प्रवेशाबाबत सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळ www.mafsu.in वर दिनांक ०१/०८/२०२३ पासून उपलब्ध राहतील.