राज्याच्या सरकारी रुग्णालयात मोठी पदभरती!
राज्यातील सरकारी रुग्णालयांत रिक्त असलेल्या पदांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. सरळसेवेने आतापर्यंत प्राध्यापक संवर्गातील ९१ सहायक प्राध्यापक संवर्गातील ५२५ पदे भरण्यात आली आहेत. प्राध्यापक संवर्गातील ११७ अध्यापकांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली आहे. तर उर्वरित रिक्त पदे भरण्यात येत आहेत. गट क संवर्गातील ५१८० पदे भरण्याकरिता टीसीएसआयओएन कंपनीकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.
गट ड संवर्गातील पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने संबंधित संस्थेचे अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

एमपीएससीमार्फत पदे भरणार:– सरकारी आयुर्वेद महाविद्यालयातील सरळसेवेने भरावयाच्या अध्यापक संवर्गातील ११४ रिक्त पदांचे आरक्षण सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. याविषयीची मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले आहे. ही पदे भरेपर्यंत कंत्राटी तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत.