युवकांनो अप्रेंटिसशिप करा अन् रोजगार मिळवा…
९ हजार अप्रेंटिस:– मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजनेंतर्गत राज्यातील विविध सरकारी खात्यांमधील रिक्त पदांवर ९ हजार तरुण-तरुणींची अप्रेंटिस म्हणून नियुक्ती केली आहे. एका विशेष कार्यक्रमात त्यांना ही नियुक्तीपत्रे दिली आहेत. अप्रेंटिसशिप योजनेंतर्गत त्यांना ८ ते १३ हजारांपर्यंत स्टायपेंड दिले जाईल.
राज्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री अप्रेंटि- सशिप योजनेंतर्गत १५ हजार अप्रेंटिसशिपच्या संधी तयार केल्या आहेत.
यापैकी ६ हजार ४०० या सरकारी खात्यांमध्ये तर ८ हजार ६०० या खासगी क्षेत्रात आहेत. अनेक खासगी कंपन्या यासाठी उत्सुक आहेत.

राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना:– राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना ही अप्रेंटिसशिपला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. योजनेंतर्गत अप्रेंटिसला प्रशिक्षणासाठी दीड हजार रुपये दिले जातात. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत जानेवारी २०२३ पर्यंत २८५.८८ कोटी रु. केंद्राने दिले आहेत.