जळगांव जिल्हा पोलिस पाटील पदभरती 2023
जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत पोलिस पाटील पद भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिनांक 31/07/2023
पोलिस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्ज व विहित चलनाव्दारे भरलेले प्रक्रिया शुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. भरती प्रक्रिया / परीक्षा स्थगीत करणे किंवा रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट, आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल.